निरोप घेताना...
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रुप तुझा संग जागे मग लोचनी...
निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी...
निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधार ही येई तेव्हा चेहरा तुझाच घेऊनी...
निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाते...
No comments:
Post a Comment