LATEST:


विजेट आपके ब्लॉग पर

Thursday, 23 June 2011


माझ्या मनातील आठवणी ….
“मन”, खर तर वेड मन, या मनात खुप काही जपलेल असतं, खुप सार्‍या गोष्टी, खुप सार्‍या आठवणी; पण ते सहजपणे कुणासमोर मांडता येत नाही. तसे पहायला गेले तर मनाला आयुष्यात खुप मोठे अस्तित्व आहे, ते कधी रमते तर कधी तुटते, मन शांत म्हणजे सर्व काहि ठिक असते.
आपण जेव्हा एखादे काम मनापासुन करतो तेव्हा ते यशस्वी होते. आयुष्यात "काहीतरी वेगळ" करावे असे ठरवले आणि हा छंद जडला. माझ्या आयुष्यातले काही क्षण, काही आठवणी माझ्या या "मनातील आठवणी" या पुस्तकाद्वारे मांडल्या आहेत.
मनातल्या भावनांना उगाच वाट करुन दिली, कालच आणलेली कोरी वही लेगेचच भरुन गेली, बघता बघता हा नवा छंद जडला, शब्दांशी खेळतांना, आयुष्याचा एक डाव सरला. दिवसा स्वप्न पहाव आणि ते पूर्ण व्हाव अस काही झाल जेव्हा मी माझी पहिली कविता लिहाली. कविता लिहताना मी माझ्या मनातील भावना मांडत होती. आणि माझ्या भावनांना माझ्या नकळत शब्द सापडत होते.
माझी प्रत्येक कविता माझ्या जवळील व्यक्तिसाठीच आहेत. त्यात माझ्या त्यांच्यासाठी वाटणार्‍या भावना आहेत. जे मी त्याना नाही सांगू शकत ते कवितेत सांगण्याचा माझा प्रयत्न.....
माझ्या प्रत्येक कवितेची प्रेरणा मला स्वत:पासूनच मिळाली, कारण यामध्ये फक्त होत्या माझ्या भावना, कळता-नकळत मी त्या शब्दात मांडत होते. माझ्या जवळच्या व्यक्तीना त्या आवडल्या, पण माझ्या कविताना खरे जिवंत स्वरुप दिले ते माझा मित्र "मन" याने, त्याने माझ्या कविताना एक वेगळे स्थान निर्माण करून दिले आज त्याच्यामुळे माझ्या कविता सर्वांनपर्यंत पोहचवल्यात, त्याबद्दल मी त्याची आयुष्यभर ऋणी राहीन. काही ऋण शब्द नाही मांडता येत म्हणून मन तुझ्यासाठी एवढेच दोन शब्द मनापासुन "धन्यवाद मित्रा“

No comments:

Post a Comment