LATEST:


विजेट आपके ब्लॉग पर

Thursday, 23 June 2011

हे मन.....आणि ती....




माझ्या मनातील आठवणी ….
“मन”, खर तर वेड मन, या मनात खुप काही जपलेल असतं, खुप सार्‍या गोष्टी, खुप सार्‍या आठवणी; पण ते सहजपणे कुणासमोर मांडता येत नाही. तसे पहायला गेले तर मनाला आयुष्यात खुप मोठे अस्तित्व आहे, ते कधी रमते तर कधी तुटते, मन शांत म्हणजे सर्व काहि ठिक असते.
आपण जेव्हा एखादे काम मनापासुन करतो तेव्हा ते यशस्वी होते. आयुष्यात "काहीतरी वेगळ" करावे असे ठरवले आणि हा छंद जडला. माझ्या आयुष्यातले काही क्षण, काही आठवणी माझ्या या "मनातील आठवणी" या पुस्तकाद्वारे मांडल्या आहेत.
मनातल्या भावनांना उगाच वाट करुन दिली, कालच आणलेली कोरी वही लेगेचच भरुन गेली, बघता बघता हा नवा छंद जडला, शब्दांशी खेळतांना, आयुष्याचा एक डाव सरला. दिवसा स्वप्न पहाव आणि ते पूर्ण व्हाव अस काही झाल जेव्हा मी माझी पहिली कविता लिहाली. कविता लिहताना मी माझ्या मनातील भावना मांडत होती. आणि माझ्या भावनांना माझ्या नकळत शब्द सापडत होते.
माझी प्रत्येक कविता माझ्या जवळील व्यक्तिसाठीच आहेत. त्यात माझ्या त्यांच्यासाठी वाटणार्‍या भावना आहेत. जे मी त्याना नाही सांगू शकत ते कवितेत सांगण्याचा माझा प्रयत्न.....
माझ्या प्रत्येक कवितेची प्रेरणा मला स्वत:पासूनच मिळाली, कारण यामध्ये फक्त होत्या माझ्या भावना, कळता-नकळत मी त्या शब्दात मांडत होते. माझ्या जवळच्या व्यक्तीना त्या आवडल्या, पण माझ्या कविताना खरे जिवंत स्वरुप दिले ते माझा मित्र "मन" याने, त्याने माझ्या कविताना एक वेगळे स्थान निर्माण करून दिले आज त्याच्यामुळे माझ्या कविता सर्वांनपर्यंत पोहचवल्यात, त्याबद्दल मी त्याची आयुष्यभर ऋणी राहीन. काही ऋण शब्द नाही मांडता येत म्हणून मन तुझ्यासाठी एवढेच दोन शब्द मनापासुन "धन्यवाद मित्रा“

माझ्या मनातील आठवणी...!!! Mazya Manatil Athavani...!!!



"माझ्या मनातील आठवणी..!!! "
“मन”, खर तर वेड मन, या मनात खुप काही जपलेल असतं, खुप सार्‍या गोष्टी, खुप सार्‍या आठवणी; पण ते सहजपणे कुणासमोर मांडता येत नाही. तसे पहायला गेले तर मनाला आयुष्यात खुप मोठे अस्तित्व आहे, ते कधी रमते तर कधी तुटते, मन शांत म्हणजे सर्व काहि ठिक असते.
आपण जेव्हा एखादे काम मनापासुन करतो तेव्हा ते यशस्वी होते. आयुष्यात "काहीतरी वेगळ" करावे असे ठरवले आणि हा छंद जडला. माझ्या आयुष्यातले काही क्षण, काही आठवणी माझ्या या
"माझ्या मनातील आठवणी..!!! " या पुस्तकाद्वारे मांडल्या आहेत.



माझ्या मनातील आठवणी..!!! Mazya Manatil Aathavani...!!!


"माझ्या मनातील आठवणी..!!!"
“मन”, खर तर वेड मन, या मनात खुप काही जपलेल असतं, खुप सार्‍या गोष्टी, खुप सार्‍या आठवणी; पण ते सहजपणे कुणासमोर मांडता येत नाही. तसे पहायला गेले तर मनाला आयुष्यात खुप मोठे अस्तित्व आहे, ते कधी रमते तर कधी तुटते, मन शांत म्हणजे सर्व काहि ठिक असते.
आपण जेव्हा एखादे काम मनापासुन करतो तेव्हा ते यशस्वी होते. आयुष्यात "काहीतरी वेगळ" करावे असे ठरवले आणि हा छंद जडला. माझ्या आयुष्यातले काही क्षण, काही आठवणी माझ्या या
"माझ्या मनातील आठवणी..!!! " या पुस्तकाद्वारे मांडल्या आहेत.



Wednesday, 22 June 2011

प्रेम...Prem Love

 प्रेम... 
आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तूझंच नाव येतेयं
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत.. 

कुणीतरी...Kunitari...

 कुणीतरी...
कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसणारं...
भरलेच आसवांनी,
 तर डोळे पुसणारं

कुणीतरी असावं
आपलं म्हणता येणारं
केलं परकं जगानं,
तरी आपलं करुन घेणारं


आठवण... Aathavan...

 आठवण...
कुणाची तरी वाट पाहणं
ही वेडया मनाची आशा...
कोणासाठी तरी झुरणं ही
वेड्या प्रेमींची नशा....

आठवण...Aathavan...

आठवण...
पावसाची सर आता नुकतीच बरसली
आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली...



आठवण...Aathavan...

 आठवण...
पावसाची सर आता नुकतीच बरसली

आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली......

सपान निळे...Sapan Neele...

 सपान निळे... 
ओझरता स्पर्श उमलती मनी चांदणफुले..
हळवी पाखरं नजरानजर आकाशझुले...
मिटताना घट्ट अलवार शब्द आनंदमळे...
मनी छनछन मलमली गान घुंगरवाळे...
सोनेरी पहाट हिरव्या रानात सपान निळे...

तुझा भास....Tuza Bhasss...

 तुझा भास....
तुझ्या नजरेत असेल काय?
प्रेमाच्या गावात स्वतःला विसरुन जावे अशी वेगळीशी नशा...
की नजरेतुन प्रेमवाट शोधणारी मनाची वेडीशी आशा...

तुझा स्पर्श जाणवेल कसा?
पहिल्या पावसाचा थेंब अंगावर झेलावा तसा...
की श्रावणातल्या वार्‍याने अंगावर शहारा येतो एकदम तसा...

भेटीची ओढ...Bhetichi Odh

 भेटीची ओढ...  



गारठलेल्या सकाळी उंबरठा ओलांडून
एक प्रकाशाची लकेर माझ्या घरात आली,
मग आठवलं...
तुला भेटण्याची वेळ जवळ आली...

प्रेम...Prem Love

प्रेम...
आठवणीत तिच्या डोळे मिटुन रात्र रात्र जागायचयं...
चांदण्यांसंगे जाऊन गगनी अंगणभर पसरायचं...

जागेपणी स्वप्नातही तिचंच होऊन जगायचयं....
आठवणीच्या बिछाण्यावर फुल होऊन निजायचयं




प्रेम...Prem Love

प्रेम...
तासनतास् गुंतते मन..
तुझ्या मनाच्या बेटावर...
कधी नदी काठावर...
कधी एखाद्या घाटावर...

उरतो मी न माझा...
सोबती तुझा सुवास...
जागतो रात्र रात्र...
गगनी तुझाच भास...



प्रेम...Prem Love

प्रेम... 
संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत...
मनही काहिसं जुनंच
तेहीनवी तार छेडतायत...

प्रेम...Prem Love

प्रेम...
झुळुक लाजरी येते
अन् स्वप्न वेलीवर झुलते...
सांज सावळी येते...
अन् उगीच धडपड होते...
देना चाहुल सजनी
आज भाव मनी हा दाटे...
येशील का तू सांग
एकदा तुझवीन जगणे अधुरे वाटे...

प्रेम...Prem Love

 प्रेम...
 आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तूझंच नाव येतेयं
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत..

प्रेम...Prem Love

प्रेम...  
संध्याकाळची वेळ पुन्हा ही
निळी होऊनी नटते..
सुगंधित ही रातराणी
तुझ्यासाठी सजते...

प्रेम...Prem...Love

प्रेम...
कळीचं फुलनं हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुण...
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडी तराणे...
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद...



प्रेम...Prem Love


प्रेम...
आता राहवेना मूळीच
कसे सांगू हे तुला?..
दाटुन येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला...



ती म्हणजे...Ti Mhanje....


ती म्हणजे...
ती म्हणजे झुळुक ती म्हणजे वारा...
ती म्हणजे पाऊस ती म्हणजे गारा...
कधी ती पाखरांचे बोल कधी ती अबोल
कधी ती आकाश कधी ती दर्याहुन खोल...

कधी सापडते माझीच मला
कधी मानाच्या गावात...
कधी पाहतो स्वप्नात तिला
कधी राधेच्या नावात...



लाट आशेची...Laat Aashechi...


लाट आशेची...
आलेली लाट विरुन तर जातेच पुन्हा त्याच सागरात
किनार्‍यावर उरतात तेच कण भिजलेले, विस्कटलेले,
पुन्हा येण्यार्‍या लाटेच्या प्रति़क्षेत नव्याने नटलेले
येणारी हर एक लाट अशी...

निरोप घेताना... Nirop Ghetana

निरोप घेताना... 
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रुप तुझा संग जागे मग लोचनी... 
निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी...

निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधार ही येई तेव्हा चेहरा तुझाच घेऊनी...

निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाते...

तु नसताना... Tu Nasatna...


 तु नसताना...
तुझ्यासोबत बोलणे कल्पनेच्या आरश्यात तुलाच बघणे
आठवांच्या झुल्यात झुलणे
कधी शब्दविन बोलणे
आता झालंय तु नसताना...

विरह...Virah


 विरह...
आज पुन्हा एकदा तुला
स्वप्नात पाहिले..
नाहीच तु... आभास सारे...
हासू ओठांवर थिजले थिजल....